
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025। फलटण । येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले उत्सव समितीचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. येथील उत्सव समितीचे काम अल्पावधीमध्ये महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहे. याठिकाणच्या जयंती उत्सवाचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारचे उत्सव सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या उत्सव समितीचे काम महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन श्री क्षेत्र अरण (ता. माढा जि. सोलापूर) येथील श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचे सतरावे वंशज ह.भ.प सावता महाराज वसेकर यांनी केले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामास भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रभू महाराज माळी,गोविंद भुजबळ, अमोल रासकर, शरदराव कोल्हे, सुभाषराव अभंग, राहुल शिंदे यांच्यासह उत्सव समितीचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.