फलटणच्या G-Champ Abacus चे ‘अबॅकस’ परीक्षेत घवघवीत यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ डिसेंबर २०२४ | फलटण |
G-Champ Abacus संचलित गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट, पुणे या ठिकाणी १५ डिसेंबर २०२४ रोजी G-Champ Abacus नॅशनल लेवल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत देशभरातून सुमारे ऑनलाईन व ऑफलाईन ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत फलटण येथील G-Champ Abacus च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

फलटणमध्ये संजीवराजेनगरात G-Champ Abacus ही शैक्षणिक संस्था कार्यरत आहे. या संस्थेतील कु. उत्कृर्ष गणेश खुळे हिने लेवल १ अ मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून G-ChampSuperStar चे बक्षीस मिळवले. तसेच कु. सुमित शैलेश नाळे याने G-Champ Beginner मध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवून Second Rank चे बक्षीस मिळवले, तसेच कु. रोनक रोहित तेली याने G-ChampJr Advance मध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवून Second Rank चे बक्षीस मिळवले. विद्यार्थ्यांना ‘जी चँप अबॅकस’चे डायरेक्टर योगेश देशमाने सर व सौ. आरती देशमाने मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या यशामागे फलटण G-Champ Abacus च्या संचालिका सौ. निकिता ज्ञानेश्वर आगवणे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. या क्लासेसचे यश पाहून सौ. निकिता ज्ञानेश्वर आगवणे मॅडम यांना ‘नॅशनल लेवल बेस्ट टिचर’ सन्मानाने गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे आयोजन पुणे येथे ‘जी चँप अबॅकस’चे डायरेक्टर योगेश देशमाने सर व सौ. आरती देशमाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

फलटण येथील अबॅकस क्लाससाठी संपर्क मो. नं. ९३२२५५२४८९, ९२८४९६१६४०.


Back to top button
Don`t copy text!