
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ, ॲड. बाबूराव गावडे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटणच्या राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
ॲड. बाबूराव गावडे यांनी फलटणचे नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. राजकारणासोबतच, त्यांनी वकिली आणि नोटरीच्या माध्यमातून नागरिकांना कायदेशीर सेवा दिली. एक अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.