
स्थैर्य, फलटण, दि. 9 ऑक्टोबर : सफाई कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे फलटणचे सुपुत्र अशोक मारुडा यांची अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या (रजि. नं. २२६१) प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अशोक मारुडा हे कामगारांच्या प्रश्नांवर नेहमीच संघर्षशील आणि लढाऊ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या निवडीमुळे संघटनेला राज्य पातळीवर एक मजबूत नेतृत्व मिळाले असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
या निवडीबद्दल युनियनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजू मारुडा, जिल्हाध्यक्ष सुरज सोलंकी, फलटण शहराध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, युवा जिल्हाध्यक्ष आनंद डांगे, पुणे विभागीय अध्यक्ष मयूर मारुडा, सचिव नितीन वाळा, महामंत्री लखन डांगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.