फलटणकरांनी अँब्युलन्स व शववाहिकेचा उपयोग करावा : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १४ : सध्या फलटणमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे. फलटण मधील जर कोणाला कोरोना झाला तर त्यास रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही, असे प्रकार सध्या वाढलेले आहेत. कोरोना रुग्णांसह फलटणमधील सर्वांना अल्पदरात रुग्णवाहिका म्हणजेच अँब्युलन्स उपलब्ध होण्यासाठी फलटण नगरपरिषदेने चौदाव्या वित्तआयोगातून अँब्युलन्सची खरेदी केलेली आहे. या सोबतच फलटण शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी एक शववाहिका सुद्धा नगरपालिकेने खरेदी केलेली आहे. फलटण नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांना शववाहिका हि मोफत दिली जाणार आहे. तर तालुक्यातील नागरिकांना शववाहिका हि अल्पदरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. फलटण शहरातील नागरिकांसाठी नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या अँब्युलन्स व शववाहिकेचा उपयोग नागरिकांनी करावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण नगरपरिषदेच्या प्रांगणात नुतन अँब्युलन्स व शववाहिकेचा पुजन समारंभ नुकताच संपन्न झाला. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, आरोग्य व वैद्यकीय सभापती सनी अहिवळे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले, सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, सौ. वैशाली चोरमले, सौ. वैशाली अहिवळे, श्रीमती रंजना जगन्नाथ कुभांर, श्रीमंत रामराजे युवा मंचचे संस्थापक राहुल निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रुग्णवाहिका हे वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन असते ज्यात रूग्णालयांसारख्या उपचाराच्या ठीकाणी रूग्णांची ने-आण करण्यासाठी वापरतात. काही वेळेस रुग्णालयाबाहेरची वैद्यकीय सेवा देखील रुग्णवाहिकेत रुग्णाला पुरवली जाते. आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे रूग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. आपत्कालीन काळजी घेण्याकरिता उपकरणे बाळगू शकतात आणि रूग्णालयात रुग्णालयात किंवा इतर निश्चित काळजी घेतात. सध्या फलटणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हि झपाट्याने वाढत आहे, काही आपत्कालीन परिस्थिती मध्ये रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी फलटण मध्ये रुग्णवाहिका असणे गरजेची होती. फलटण शहरातील नागरिकांनी फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा आणि शववाहिकेचा उपयोग फलटणकरांनी करून घ्यावा, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व फलटण नगर परिषदेचे नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण शहरामध्ये असणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून अल्पदरात रुग्णवाहिका व मोफत शववाहिका सुरु करण्यात आलेली आहे. फलटण नागरपरिषदेस प्राप्त झालेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून फलटण शहरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका व शववाहिका सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याच अनुषंगाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून फलटणकरांच्या सेवेमध्ये रुग्णवाहिका व शववाहिका दाखल झालेली आहे. तरी आगामी काळामध्ये कोणालाही जर रुग्णवाहिका किंवा शववाहिका लागणार असेल तर त्यांनी तातडीने नगरपालिकेत संपर्क साधावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!