
दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । फलटण । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून फलटणमध्ये राजे कुटुंबीयांच्या वतीने दिवाळी किट्सचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
फलटण शहरामधील गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड करण्याच्या हेतूने फलटण शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटणमध्ये दिवाळी निमित्ताने सर्वसाधारण कुटुंबाला लागणारा शिधा फलटण शहरातील नागरिकांना घरपोच करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मध्ये सर्वसामान्य नागरिकांचे बरेच हाल दिवाळीमध्ये झालेले होते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण शहरामध्ये किराणा किट्स वाटप करण्यात आलेले आहे.