स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 17 ते 22 जुलै या काळात जिल्ह्यात लॉकडाउन जारी केला होता. या काळात जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यवसाय करणारी दुकाने, भाजीपाला मंडई, वाईन शॉप, बिअर बार परमिट रूम, हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तदनंतर जिल्ह्यासह सातार्यात अंशत: लॉकडाउन अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करणारी दुकाने, ठोक विक्रेते, भाजीपाला, मटण, चिकन, मासे, फळविक्रेते आठवडी व दैनंदिन बाजार आज सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फलटणकर घराबाहेर पडू लागले. रस्त्यावर सर्वत्र दुचाकी, चारचाकी वाहने निदर्शनास येऊ लागली आहेत. मात्र विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरत आहेत त्यांच्यावर जाग्यावरच दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक शब्दात समज देण्यात यावी, असे मत सुजाण नागरिकांचे आहे.