फलटणमध्ये खासदार गट वि. राजे गट ‘आमने-सामने’! अर्जांची छाननी पूर्ण, ५८ (ZP) आणि ११० (PS) उमेदवार रिंगणात; वाचा कोणाचे कोणाशी होणार ‘सामना’


फलटण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण. जिल्हा परिषदेसाठी ५८ तर पंचायत समितीसाठी ११० उमेदवार पात्र. खासदार गट (भाजप-राष्ट्रवादी) वि. राजे गट (शिवसेना) यांच्यात सरळ लढती निश्चित. वाचा सविस्तर आकडेवारी आणि लढतीचे चित्र…

स्थैर्य, फलटण, दि. 23 जानेवारी : फलटण तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीतील पहिला टप्पा पार पडला असून, उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल (दि. २२) तहसीलदार कार्यालयात शांततेत पार पडली. या छाननीनंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, तालुक्यात ‘काटे की टक्कर’ होणार हे निश्चित झाले आहे. संपूर्ण तालुक्यात प्रामुख्याने ‘खासदार गट’ (भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती) आणि ‘राजे गट’ (शिवसेना) यांच्यातच प्रमुख आणि सरळ लढती (Straight Fight) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छाननीचा सविस्तर तपशील: ११० उमेदवार मैदानात

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार:

  • जिल्हा परिषद (ZP): ५८ व्यक्तींचे एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये हे सर्व अर्ज वैध ठरले असून, एकही अर्ज बाद झालेला नाही.

  • पंचायत समिती (PS): १११ व्यक्तींचे एकूण ११९ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ अर्ज अवैध ठरल्याने आता पंचायत समितीच्या रिंगणात ११० उमेदवार पात्र ठरले आहेत.

राजकीय समीकरणे आणि गटांचे बलाबल

या निवडणुकीत फलटणचे राजकारण दोन प्रमुख गटांत विभागले गेले आहे:

  1. खासदार गट (महायुती): माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस.
  2. राजे गट (शिवसेना): विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना.

वाचकांच्या माहितीसाठी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमधील ‘खासदार गट विरुद्ध राजे गट’ अशा लढतींचे चित्र खालील तक्त्यात दिले आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय लढती

जिल्हा परिषद गटाचे नाव खासदार गट (भाजप/राष्ट्रवादी) उमेदवार राजे गट (शिवसेना) उमेदवार
तरडगाव

सुर्यकांत कृष्णाजी खरात (भाजप) 

गिरीश सुदाम बनकर (शिवसेना) 

साखरवाडी-पिंपळवाडी

संचिता सागर कांबळे (भाजप) 

रुपाली लक्ष्मण सरगर (शिवसेना) 

विडणी

सुषमा अविनाश मोरे (राष्ट्रवादी) 

ज्योती गौतम मोरे (शिवसेना) 

गुणवरे

ऋतुजा अभिजीत जगताप (राष्ट्रवादी) 

हेमलता अनिल जगताप (शिवसेना) 

बरड

भाऊसाहेब पोपट मोरे (भाजप) 

वैशाली संदिप कांबळे (शिवसेना) 

कोळकी

जयकुमार अरविंद शिंदे (भाजप) 

सह्याद्री सुर्याजीराव कदम (शिवसेना) 

वाठार (निंबाळकर)

विष्णू किसन लोखंडे (भाजप) 

निलेश बापुराव लोखंडे (शिवसेना) 

हिंगणगाव

किरण निलेश नलवडे (भाजप) 

सारिका धैर्यशिल अनपट (शिवसेना) 

पंचायत समिती गणनिहाय लढती

पंचायत समिती गणाचे नाव खासदार गट (भाजप/राष्ट्रवादी) उमेदवार राजे गट (शिवसेना) उमेदवार
पाडेगाव

अमोल बन्यासो खराडे (भाजप) 

कृष्णात दादा झेंडे (शिवसेना) 

तरडगाव

स्मिता प्रशांत गायकवाड (भाजप) 

योगिता दिपक गायकवाड (शिवसेना) 

साखरवाडी-पिंपळवाडी

शिवांजली विक्रमसिंह भोसले (राष्ट्रवादी) 

कमल शंकर माडकर (शिवसेना) 

सस्तेवाडी

विजय आप्पासो भिसे (भाजप) 

गणेश मल्हारी तांबे (शिवसेना) 

सांगवी

सारिका संजय सोडमिसे (राष्ट्रवादी) 

पुष्पा रामचंद्र चोपडे (शिवसेना) 

विडणी

सचिन गजानन अभंग (भाजप) 

किरण उत्तमराव शेंडे (शिवसेना) 

गुणवरे

वनिता धनाजी आढाव (राष्ट्रवादी) 

वैशाली अतुल कांबळे (शिवसेना) 

आसू

संजय रघुनाथ पवार (राष्ट्रवादी) 

भिमराव दामोदर पवार (शिवसेना) 

बरड

अनिता संतोष गावडे (भाजप) 

स्वाती हणमंत आटोळे (शिवसेना) 

दुधेबावी

मनिषा लक्ष्मण सोनवलकर (भाजप) 

विजया हनमंत सोनवलकर (शिवसेना) 

कोळकी

विकास अशोक नाळे (भाजप) 

अशोक गेनबा नाळे (शिवसेना) 

जाधववाडी (फ)

युवराज नरसिंग सस्ते (भाजप) 

अमोल दशरथ सस्ते (शिवसेना) 

वाठार (निंबाळकर)

शुभांगी तुकाराम शिंदे (भाजप) 

स्वाती विकास तरटे (शिवसेना) 

सुरवडी

धनंजय प्रल्हादराव साळुंखे (भाजप) 

किरण लक्ष्मणराव साळुंखे (शिवसेना) 

सासवड

संतोष हणमंत खताळ (भाजप) 

संतोष अंकुश करंडे (शिवसेना) 

हिंगणगाव

सिमा सुरेश भोईटे (भाजप) 

सीमा शरद भोईटे (शिवसेना) 


Back to top button
Don`t copy text!