
फलटण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी जाहीर. विडणी पंचायत समिती गणात बंडखोरी शमल्याने सरळ लढत. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली अधिकृत माहिती. पहा कोणाचे कोणाशी होणार सामने…
स्थैर्य, फलटण, दि. २८ जानेवारी : फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव यांनी अंतिम उमेदवारांची यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. या यादीनुसार अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात नेत्यांना यश आले असून, खासदार गट (महायुती) विरुद्ध राजे गट (शिवसेना) अशा थेट लढती रंगणार आहेत.
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या विडणी पंचायत समिती गणात छाननीपर्यंत १६ उमेदवार होते, मात्र आता तिथे केवळ दोनच उमेदवार उरल्याने सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कोळकी जिल्हा परिषद गटात मात्र बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
डॉ. अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय अंतिम उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे:
सातारा जिल्हा परिषद गट : अंतिम उमेदवार यादी
फलटण पंचायत समिती गण : अंतिम उमेदवार यादी
(टीप: वरील यादीत काही प्रमुख गणांचा समावेश केला आहे. संपूर्ण अधिकृत यादी तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.)
-
सरळ लढती: तरडगाव, साखरवाडी (पं.स.), सांगवी, विडणी, आसू, सासवड आणि हिंगणगाव (पं.स.) या ठिकाणी महायुती (भाजपा/राष्ट्रवादी) आणि शिवसेना यांच्यात ‘काटे की टक्कर’ होणार आहे.
-
बंडखोरीचा फटका: कोळकी, बरड आणि वाठार निंबाळकर गटात रासप, वंचित आणि अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्याने येथील लढती चुरशीच्या बनल्या आहेत.
-
विडणीत हायव्होल्टेज ड्रामा संपला: विडणीत १६ उमेदवारांपैकी १४ जणांनी माघार घेतल्याने आता सचिन अभंग (भाजपा) वि. डॉ. किरण शेंडे (शिवसेना) असा सरळ सामना रंगणार आहे.
