
फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी ७१.८१ टक्के प्राथमिक मतदान. सुरवडी आणि सासवड गणात सर्वाधिक उत्साह. १,८१,८३२ मतदारांनी बजावला हक्क. वाचा गणनिहाय अंतिम आकडेवारी…
स्थैर्य, फलटण, दि. 08 फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची (Satara ZP & Phaltan PS Election 2026) मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात एकूण ७१.८१ टक्के मतदान झाले आहे. तालुक्यातील एकूण २,५३,२२७ मतदारांपैकी १,८१,८३२ मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.
सुरवडी गणात सर्वाधिक उत्साह; साखरवाडीत निरुत्साह प्राप्त आकडेवारीनुसार, सुरवडी (Suravadi) पंचायत समिती गणात मतदारांनी सर्वाधिक उत्साह दाखवला असून येथे ७५.९५ टक्के विक्रमी मतदान झाले आहे. त्याखालोखाल सासवड (Saswad) गणात ७५.८७ टक्के मतदान झाले आहे. तर दुसरीकडे साखरवाडी-पिंपळवाडी गणात सर्वात कमी म्हणजे ६९.११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
स्त्री-पुरुष मतदानाची आकडेवारी:
-
एकूण मतदान: १,८१,८३२
-
पुरुष मतदान: ९५,३८८
-
स्त्री मतदान: ८६,४४१
-
इतर: ०३
गणनिहाय झालेली प्राथमिक मतदानाची टक्केवारी (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत):
टीप: ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून, मतदान साहित्याची जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहते. त्यामुळे अंतिम आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
