वृक्ष लागवडीत फलटणला राज्यात रोल मॉडेल करु: श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 11 जुलै 2023 | फलटण | जागतिक तापमान वाढीवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. वृक्षारोपणाच्या बाबतीत फलटण तालुका हा राज्यात रोल मॉडेल करण्याचे आमचे स्वप्न आहे. आजचा हा बिल्डर असोसिएशनचा कार्यक्रम पाहून निश्चितच आमचे स्वप्न साकार करण्यासाठी फलटणकर सरसावले असल्याची खात्री पटली असल्याचे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

आज मंगळवार (दि. ११) रोजी जागतिक लोकसंख्या दिन व माझी वसुंधरा अभियानाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरने, वॉकर्स ग्रुप, फलटण आणि सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील न्यायालय व विमानतळ परिसरात ३५० झाडे लावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळेस ते बोलत होते.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष किरण दंडीले, उपाध्यक्ष सुनील सस्ते, सचिव स्वीकार मेहता, खजिनदार संजय डोईफोडे, संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, दिलीप शिंदे, रणधीर भोईटे, राजीव नाईक निंबाळकर, विक्रम झांझुर्णे, डॉ. महेश बर्वे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाळासाहेब गंगावणे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, वनअधिक्षक दिगंबर जाधव, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

श्रीमंत रामराजे म्हणाले, वसुंधरा अभियानाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरने, वॉकर्स ग्रुप, फलटण आणि सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांनी आयोजित केलेला वृक्षारोपणाचा उपक्रम स्तुत्य आहे. तरुणांनी या वृक्षारोपणाच्या मोहिमेत हिरीरीने सहभागी झाले पाहिजे. जागतिक तापमान वाढीचे संकट रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

आमदार दीपक चव्हाण म्हणाले, वृक्षारोपण करण्यासोबतच त्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असते. आपण वृक्षारोपण केल्यानंतर ती झाडे किती जपतो, याचे भान सर्वाना असणे गरजेचे आहे.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले, आज खर तर जागतिक लोकसंख्या दिन आहे. ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे वृक्ष लागवड देखील वाढली पाहिजे. लोकसंख्या वाढीच्या रेकॉर्डपेक्षा वृक्ष लागवडीचे रेकॉर्ड आपण केले पाहिजे, असे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आशिष गडकरी प्रवीण नाईक निंबाळकर, महेश गरवालिया, शफीक मोदी, बापूराव जगताप, जावेद तांबोळी, अभिजित इंगळे, सुनील जंगम, महेश साळुंखे, राजेंद्र कापसे, लालासाहेब लकडे, निखिल सोडमिसे, स्वप्नील सोडमिसे, विकास म्हेत्रे, कुणाल शेंडे, संदीप चोरमले, राजेंद्र कुंभार, संजय शिंदे, सचिन कदम, सिकंदर डांगे, तेजसिंह इंगळे, कुमार भट्टड, अजय घाडगे, विवेक गायकवाड, धनाजी शिंदे, नरेंद्र तावरे, राम नाईक निंबाळकर, विशाल पवार, शिवराज नाईक निंबाळकर, जितेंद्र मुळीक यांच्यासह मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची व मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळेस डॉ. महेश बर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. मुधोजी हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. स्वागत युनिटी डेव्हलपरचे प्रमोद निंबाळकर यांनी केले. आभार बिल्डर असोसिएशनचे सचिव स्विकार मेहता यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!