फलटणचा आठवडी बाजार पुढील आदेशा पर्यंत रद्द; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांची माहिती


स्थैर्य, फलटण, दि.१६ : फलटण तालुक्यासह फलटण शहरामध्ये कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फलटण शहरातील दर आठवड्याला रविवारी असणारा आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.

फलटण शहरामध्ये दर रविवारी आठवडी बाजार भरतो तो आठवडी बाजार कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी सर्व भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी प्रशासनास सहकार्य करून रविवारी कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ देऊ नये व इतर दिवशी फलटण शहरामध्ये फिरणाऱ्या सर्वांनीच नियमित रित्या मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे याबरोबरच वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात सुद्धा धुवावेत असेही आवाहन प्रसाद काटकर यांनी यावेळी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!