
दैनिक स्थैर्य | दि. ०१ मार्च २०२५ | विधान भवन, पुणे | नीरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती आहे.
ही बैठक पुण्याच्या विधान भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत फलटण तालुक्यासह आणि सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला किती पाणी द्यायचे, यावर चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली जाणार आहे.
नीरा खोऱ्यातील या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. आगामी हंगामासाठी पाण्याचे वाटप करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली जाते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यांसाठी पाणीप्रश्नासंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील काही गावांसाठी कायमस्वरूपी नीरा खोऱ्यामधील पाणी आरक्षित करण्यात यावे; याबाबत मागणी केली आहे.
सदरील मागणीवर फलटण तालुक्याच्या वतीने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कडाडून विरोध करत आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटणार आहेत.