फलटण: प्रभाग ४ व ८ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार; लोकहिताच्या अपेक्षा व्यक्त


फलटणमधील प्रभाग ४ व ८ मधील नवनिर्वाचित नगरसेवक–नगरसेविकांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकहिताची भूमिका घेण्याचे आवाहन.

स्थैर्य, फलटण, दि. २० जानेवारी : फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ४ आणि प्रभाग क्रमांक ८ मधील नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार समारंभ येथील हॉटेल आर्यमान येथे प्रभागातील मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांचा एकत्रित सत्कार करण्यात आल्याने लोकशाही मूल्यांचा सकारात्मक संदेश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या सत्कार समारंभात नगरसेवक पप्पूभाई शेख, नगरसेविका रुपाली सूरज जाधव, नगरसेवक विशाल तेली, नगरसेविका सिद्धाली अनुप शहा आणि नगरसेविका श्वेता किशोर ताराळकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सचिन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “प्रभागातील वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवकांचा एकत्रित सत्कार कौतुकास्पद आहे. लोकशाही मूल्यांचे पालन करत नागरिकांच्या हिताची भूमिका कायम ठेवावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्योजक सत्यजित घोरपडे यांनी तीर्थक्षेत्र फलटण शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी विद्यमान नगरसेवकांवर असल्याचे सांगितले. “आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, शुद्ध पाणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी क्रीडा व स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नितीन ताराळकर, वैभव विष्णूप्रद, किशोर भिंगरे, ॲड. राहुल सतुटे व मितेश खराडे यांनी नगरसेवकांना वृक्षभेट देऊन फलटण शहर ‘हरित शहर’ बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

संग्राम खानविलकर, सत्यजित घोरपडे, ज्ञानेश्वर दळवी, नंदकुमार मांढरे, सुरेश निंबाळकर यांनी नगरसेवकांचे स्वागत केले. मंगेश निंबाळकर, अभिजीत निंबाळकर, सुमित गाडे, योगेश रशीद शेख, किशोर देशपांडे, सचिन चोरमले, अविनाश पवार व विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. प्रास्ताविक अमृत पवार यांनी तर आभार नंदकुमार मांढरे यांनी मानले.

या सत्कार समारंभास अनुप शहा, किशोर ताराळकर, सिकंदर डांगे, अनिल तेली, योगेश शिंदे, आकाश सोनवलकर, दीपक कर्वे, अमोल राऊत, रणजीत हिंगे, ओंकार हिंगे, अभिजीत पलसे, सौरभ तेली, महेश दळवे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!