दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२१ | फलटण | सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर फलटण तालुक्यामधील राजुरी येथे व सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यामधील नातेपुते येथे विनापरवाना बेकायदा बैलगाडा शर्यतीचा डाव काही जणांकडून आखण्यात आलेला होता. हे फलटण ग्रामीण पोलिसांना कळताच फलटण ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने थेट धडक मारून फलटण तालुक्यामधील राजुरी येथील व माळशिरस तालुक्यामधील नातेपुते येथे बैलगाडा शर्यतीसाठी तयार करण्यात आलेला ट्रॅक जमीनदोस्त केला.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या राजुरी गावांमध्ये त्यासोबतच सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यामधील नातेपुतेमध्ये दर रविवारी बैलगाडा शर्यत व त्यासोबतच जुगाराचे आयोजन केले जात असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एका पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता येथे बैलगाडा शर्यतीसाठी तयार करण्यात आलेला ट्रॅक आढळून आला, परंतु बैलगाडा शर्यतीचे आयोजक किंवा तत्सम बैलगाड्या आढळून आल्या नाहीत.
बैलगाडा शर्यत खेळण्यासाठी तयार केलेली ट्रॅक सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर आढळून आले येथे आढळून आलेल्या मधून ट्रॅक जमीनदोस्त करण्यासाठी तेथील नजीकच्या परिसरांमधून जेसीबी मशिनच्या साह्याने संपूर्ण ट्रॅक उद्ध्वस्त करून संबंधित ट्रॅकवर मोठ-मोठे खड्डे खणून त्यामध्ये जुनाट बाभळी व इतर काटेरी झाडे टाकण्यात आलेली आहेत. जेणेकरून पुन्हा सदरील ट्रॅकवर बैलगाडा शर्यत भरवणे शक्य होणार नाही, अशीही माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेली आहे.