दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२४ | फलटण | २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन अर्ज प्राप्त झाली असल्याची माहिती निवडणुकी निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि; विडणी येथील हरिभाऊ रामचंद्र मोरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे प्रस्तावक म्हणून जगन्नाथ जंगल कापसे, संदीप महादेव पवार, प्रीतम विठ्ठल लोंढे, ज्ञानेश्वर रामचंद्र गायकवाड, विशाल रामचंद्र शिंदे, अमोल पोपट सपाटे, तुषार जगदेवराव नाईक निंबाळकर, अमोल रामचंद्र नाळे, काकासो आबाजी जाधव, विकास विजयसिंह कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यासोबतच फलटण तालुक्यातील सांगवी येथील रवींद्र रामचंद्र लांडगे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे प्रस्तावक म्हणून सुधीर चिंतामण अहिवळे, नितीन मारुती जगताप, ज्ञानेश्वर राजाराम बोन्द्रे, अभिजित वासुदेव माळवदे, बापू दत्तात्रय सूर्यवंशी, सचिन जगन्नाथ धुमाळ, मनोज दिलीप ढावरे, नितीन व्हिर्सें भोसले, दत्तात्रय माणिक मोहिते, सुरज भाऊसो खलाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.