फलटण विधानसभा मतदारसंघाचा मतदारयादी पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर; मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांच्या घरोघरी भेटी सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघातील छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यामध्ये आगामी वर्षाच्या १ जानेवारी या अर्हता दिनांकावर वार्षिक पुनर्रिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबरोबर आगामी वर्षातील पुढील १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या तीन अर्हता दिनांकावर आधारित आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार अभिजित जाधव यांनी दिली.

हा पुनर्रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील –

  • दि. १ जून २०२३ ते २० जुलै २०२३ : मतदारयादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच नवीनतम आयटी अ‍ॅप्लिकेशन आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी / मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण.
  • दि. २१ जुलै २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे.
  • दि. २२ ऑगस्ट २०२३ ते २९ सप्टेंबर २०२३ : मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे. मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ. आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. तसेच अस्पष्ट / मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे. कंट्रोल टेबल अद्ययावत करणे.
  • दि. ३० सप्टेंबर २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३ : नमुना १-८ तयार करणे. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे.
  • दि. १७ ऑक्टोबर २०२३ : एकत्रीकृत प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करणे.
  • दि. १७ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ : दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.
  • दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार हा विशेष मोहिमांचा कालावधी राहील.
  • दि. २६ डिसेंबर २०२३ पर्यंत : दावे व हरकती निकालात काढणे.
  • दि. १ जानेवारी २०२४ पर्यंत : अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे. डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे.
  • दि. ५ जानेवारी २०२४ : मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे.

या पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, दुरूस्ती, मतदार यादीतून नाव वगळणे इ. कामकाज आपले मतदार यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच ऑनलाईन ‘वोटर हेल्पलाईन’ मोबाईल अ‍ॅप, ‘वोटर पोर्टल’ या संकेतस्थळावरून करता येईल, अशी माहिती तहसीलदार अभिजित जाधव यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!