
स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल (दि. १८) फलटण नगरपरिषदेच्या सभागृहात शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत जाधव आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया संपन्न झाली.
या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ४ अर्ज वैध ठरले असून ४ अर्ज अवैध ठरले आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार अशोकराव जाधव, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचे अर्ज अवैध ठरल्याने खळबळ उडाली आहे. तर समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
छाननी अंती प्रभागनिहाय वैध आणि अवैध ठरलेल्या उमेदवारांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे:
नगराध्यक्ष पद
-
वैध उमेदवार: अहिवळे प्रशांत सदानंद (अपक्ष), सूर्यवंशी बेडके सचिन सुभाषराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), नाईक निंबाळकर समशेर हिंदुराव (भारतीय जनता पार्टी), नाईक निंबाळकर अनिकेत रामराजे (शिवसेना).
-
अवैध उमेदवार: जाधव अशोक जयवंतराव (भाजप), दिलीपसिंह ग्यानोबाराव भोसले (भाजप), नाईक निंबाळकर मनिषा समशेर (अपक्ष), बिचुकले संतोष बाळासाहेब (रासप).
प्रभागनिहाय वैध व अवैध उमेदवार
प्रभाग क्र. १ अ (अनु. जाती महिला)
-
वैध: आवळे लक्ष्मी प्रमोद (शिवसेना), गायकवाड करुणा प्रशांत (अपक्ष), खंडाळे रेणुका लखन (अपक्ष), चव्हाण अपूर्वा प्रथमेश (अपक्ष), लोंढे अस्मिता भीमराव (अपक्ष), पवार नर्मदा किसन (अपक्ष).
प्रभाग क्र. १ ब (सर्वसाधारण)
-
वैध: पवार सुमन रमेश (शिवसेना), जाधव सोमा गंगाराम (अपक्ष), पवार गणेश अरुण (अपक्ष), जाधव विक्रम सोमा (अपक्ष), जाधव रणजीत सोमा (अपक्ष), पवार देविदास किसन (अपक्ष).
-
अवैध: पवार देविदास किसन (दुसरा अर्ज), काकडे तेजस सुरज (आरपीआय-आठवले).
प्रभाग क्र. २ अ (अनु. जाती महिला)
-
वैध: काकडे मिना जीवन (राष्ट्रवादी काँग्रेस), रणदिवे आरती जयकुमार (शिवसेना), ऋतिका पांडुरंग अहिवळे (अपक्ष), अहिवळे सोनाली संग्राम (अपक्ष).
-
अवैध: काकडे अनिता प्रशांत (भाजप व राष्ट्रवादी), अहिवळे संजना सुनील (भाजप व राष्ट्रवादी), काकडे दीक्षा राजकुमार.
प्रभाग क्र. २ ब (सर्वसाधारण)
-
वैध: अहिवळे सुपर्णा सनी (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी), अहिवळे अनिकेत राहुल (शिवसेना), अहिवळे पांडू समुद्रलाल (अपक्ष), कुणाल किशोर काकडे (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी).
-
अवैध: अहिवळे सनी संजय (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी), अहिवळे सचिन रमेश (भाजप व राष्ट्रवादी), येवले विजय भगवान, काकडे उदय किर्तीकुमार.
प्रभाग क्र. ३ अ (अनु. जाती स्त्री/पुरुष)
-
वैध: अहिवळे सचिन रमेश (राष्ट्रवादी), अहिवळे सिद्धार्थ दत्ता (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), पलंगे हर्षद जालिंदर (अपक्ष), भोसले पुनम सुनील (शिवसेना), अहिवळे आशय हनमंत (अपक्ष), निकुडे सुनील जनार्दन (काँग्रेस).
-
अवैध: सरगर दिपक लक्ष्मण, सुनिल बापु अहिवळे, अहिवळे सिद्धार्थ दत्ता (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी), अहिवळे सतीश लक्ष्मण.
प्रभाग क्र. ३ ब (सर्वसाधारण महिला)
-
वैध: सरगर सुलक्षणा जितेंद्र (भाजप), ननावरे सुषमा हेमंत (शिवसेना).
-
अवैध: बोंद्रे पूनम मंगेश, सरगर सुलक्षणा (राष्ट्रवादी), सरगर आरती दिपक (भाजप व राष्ट्रवादी), राऊत उषा लालासो.
प्रभाग क्र. ४ अ (ना.मा.प्र. महिला)
-
वैध: हेंद्रे प्रभा चंद्रशेखर (अपक्ष), जाधव रुपाली सुरज (शिवसेना), आतार सुलमा जमीर (अपक्ष), नाईक हेमलता चंद्रकांत (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी).
-
अवैध: मणेर हिना वसीम, मायणे रुपाली विजय, मणेर रुकसार जाकीर.
प्रभाग क्र. ४ ब (सर्वसाधारण)
-
वैध: बागवान ताजुद्दीन महंमद (अपक्ष), जाधव अनिल भाऊसाहेब (अपक्ष), नाईक निंबाळकर किशोरसिंह (अपक्ष), निंबाळकर राहुल जगन्नाथ (भाजप), अजारुद्दिन ताजुद्दीन शेख (शिवसेना).
-
अवैध: आंबोले विठ्ठल शंकरराव (भाजप व राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. ५ अ (अनु. जाती महिला)
-
वैध: व्हटकर कांचन दत्तराज (भाजप), कांबळे शालन रविंद्र (अपक्ष), खंदारे योगेश्वरी मंगेश (शिवसेना उबाठा), व्हटकर सुरेखा श्रीकांत (शिवसेना).
-
अवैध: गायकवाड श्रद्धा राजेश, कांबळे कविता राहुल.
प्रभाग क्र. ५ ब (सर्वसाधारण)
-
वैध: नागटीळे रोहित राजेंद्र (भाजप), लोंढे विजय हरिभाऊ (शिवसेना), गायकवाड शुभांगी मुकुंद (शिवसेना उबाठा).
-
अवैध: जाधव अशोक जयवंतराव (भाजप), नाईक निंबाळकर प्रतापसिंह पृथ्वीराज (भाजप), नाईक निंबाळकर मनिषा समशेर (भाजप).
प्रभाग क्र. ६ अ (ना.मा.प्र. स्त्री/पुरुष)
-
वैध: राऊत किरण देवदास (भाजप), कुंभार दिपक अशोक (शिवसेना).
-
अवैध: नाळे सत्वशिल मारुतराव, आडसुळ सुर्यकांत मल्हारी.
प्रभाग क्र. ६ ब (सर्वसाधारण महिला)
-
वैध: नाईक निंबाळकर मंगलादेवी पृथ्वीराज (भाजप), सौ. अमिता सदाशिव जगदाळे (शिवसेना).
प्रभाग क्र. ७ अ (सर्वसाधारण महिला)
-
वैध: भोसले स्वाती राजेंद्र (भाजप), कर्णे श्रीदेवी गणेश (शिवसेना), तावरे लता विलास (शिवसेना उबाठा), शिंदे आरती दिपक (अपक्ष).
-
अवैध: सौ. राजेश्री विशाल राहिगुडे, सौ. पुजा जोतीराम घनवट, शिंदे आरती दिपक (शिवसेना), इनामदार हसीना रियाज.
प्रभाग क्र. ७ ब (सर्वसाधारण)
-
वैध: जाधव अशोक जयवंतराव (भाजप), गुंजवटे पांडुरंग मानसिंगराव (शिवसेना), गुंजवटे मयुर बुवासाहेब (कृष्णा भिमा विकास आघाडी).
-
अवैध: घाडगे अमोल हरिश्चंद्र, निंबाळकर राजेंद्र प्रतापराव.
प्रभाग क्र. ८ अ (ना.मा.प्र. स्त्री/पुरुष)
-
वैध: आतार फिरोज शहानवाज (भाजप), तेली विशाल उदय (शिवसेना), कर्वे विकास विठ्ठल (अपक्ष), पालकर श्रीकांत विजय (अपक्ष).
-
अवैध: कर्वे विकास विठ्ठल (भाजप), माळवे अजय दत्तात्रय (भाजप व अपक्ष).
प्रभाग क्र. ८ ब (सर्वसाधारण महिला)
-
वैध: शहा सिद्धाली अनुप (भाजप व अपक्ष), निंबाळकर शितल धनंजय (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), खानविलकर सुवर्णा अमरसिंह (शिवसेना).
-
अवैध: मांढरे मिनल महेश (भाजप व अपक्ष).
प्रभाग क्र. ९ अ (ना.मा.प्र. महिला)
-
वैध: मेटकरी रझिया मेहबूब (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), मेटकरी परवीन अब्दुल (अपक्ष), मदने कविता श्रीराम (अपक्ष), मोहोळकर मंगल अतुल (अपक्ष).
-
अवैध: मेटकरी रझिया मेहबूब (भाजप), शिरतोडे पद्मा राजू (भाजप व राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. ९ ब (सर्वसाधारण)
-
वैध: गानबोटे सचिन चंद्रकांत (अपक्ष), भोईटे अमोल प्रकाश (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), तुषार गणपतराव पवार (अपक्ष), कदम सुरज हिंदुराव (अपक्ष), पवार पंकज चंद्रकांत (काँग्रेस), भोईटे निखील विद्याधर (अपक्ष).
-
अवैध: भोईटे अमोल प्रकाश (भाजप), पवार युवराज महादेव (भाजप व राष्ट्रवादी), कदम सुरज हिंदुराव (राष्ट्रवादी व भाजप), पवार पंकज चंद्रकांत (कृष्णा भिमा विकास आघाडी).
प्रभाग क्र. १० अ (ना.मा.प्र. महिला)
-
वैध: काळे मनीषा राजेंद्र (अपक्ष), मोमीन रेहाना बशीर (भाजप व अपक्ष), भुजबळ जयश्री रणजित (अपक्ष), श्वेता किशोर तारळकर (शिवसेना).
-
अवैध: भुजबळ जयश्री रणजित (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व भाजप), काळे मनीषा राजेंद्र (भाजप), शेख पाकीजा अमीर (शिवसेना).
प्रभाग क्र. १० ब (सर्वसाधारण)
-
वैध: भोईटे अमित अशोक (भाजप), भोईटे अजय अरुण (अपक्ष), पवार विशाल पांडुरंग (कृष्णा भिमा विकास आघाडी), शिरतोडे गणेश सुर्यकांत (शिवसेना), चव्हाण नाना शामराव (अपक्ष), गायकवाड मोनिका महादेव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).
प्रभाग क्र. ११ अ (ना.मा.प्र. स्त्री/पुरुष)
-
वैध: भोई सनी ताराचंद (अपक्ष), चोरमले संदीप दौलतराव (भाजप), चोरमले कृष्णाथ मल्हारी (शिवसेना), शेख अमीर गनिम (अपक्ष).
-
अवैध: भोई सनी ताराचंद (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), चोरमले स्वाती संदीप.
प्रभाग क्र. ११ ब (सर्वसाधारण महिला)
-
वैध: निकम प्रियांका युवराज (शिवसेना), भोसले प्रियदर्शनी रणजितसिंह (भाजप), दोशी ज्योती अजयकुमार (अपक्ष).
प्रभाग क्र. १२ अ (अनु. जाती स्त्री/पुरुष)
-
वैध: अरुण हरिभाऊ खरात (भाजप), काकडे विकास वसंतराव (शिवसेना), पाटोळे ओम प्रकाश (अपक्ष).
-
अवैध: आगवणे प्रविण तुळशीराम (भाजप), मारुडा राजू नानू (आरपीआय-आठवले).
प्रभाग क्र. १२ ब (सर्वसाधारण महिला)
-
वैध: पवार नताशा रोहन (नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), शहा स्मिता संगम (शिवसेना), फुले स्वाती हेमंत (भाजप).
-
अवैध: शहा प्रिती अतुल, काळे चंदा प्रकाश, शहा सुनंदा सुधीर, भोसले भारती राजेश.
प्रभाग क्र. १३ अ (ना.मा.प्र. महिला)
-
वैध: मोहिनी मंगेश हेंद्रे (भाजप), बागवान सानिया फिरोज (कृष्णा-भिमा विकास आघाडी), शेख पाकीजा अमिर (अपक्ष).
-
अवैध: मोहिनी मंगेश हेंद्रे (राष्ट्रवादी), शेख पाकीजा अमिर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).
प्रभाग क्र. १३ ब (सर्वसाधारण महिला)
-
वैध: रुपाली अमोल सस्ते (भाजप), काकडे निर्मला शशिकांत (अपक्ष).
-
अवैध: कदम विजया ज्ञानेश्वर, रुपाली अमोल सस्ते (राष्ट्रवादी), काकडे निर्मला शशिकांत (अपक्ष- एक अर्ज अवैध), सौ. कदम स्नेहल आकाश.
प्रभाग क्र. १३ क (सर्वसाधारण)
-
वैध: सूर्यवंशी बेडके सचिन सुभाषराव (अपक्ष व काँग्रेस), निंबाळकर राहुल अशोक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शेडगे मनोज दत्तात्रय (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार).
-
अवैध: निंबाळकर राहुल अशोक (भाजप), अमोल शिरीष सस्ते (भाजप).

