![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/Sthairya-Crime-1.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ०९ फेब्रुवारी २०२५ | फलटण | दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६:५० वाजता, फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी पुरुष जातीचे बेवारस मयताची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना भवानी मार्केट तळ मजला गाळा नं.२ चे समोर, फलटण बस स्थानकाजवळ घडली.
अनोळखी पुरुष जातीचे बेवारस मयत हदय विकाराचे कारणाने मृत पावले आहेत. मयताचे वर्णन असे आहे. पांढरा मळकट शर्ट, काळया रंगाची मळकट फुल पॅन्ट, कंबरेला काळे रंगाचा कडदोरा, बांधा सडपातळ, वर्ण सावळा, उंची ४.५ फुट, उजवे छातीवर ३ तिळ, डावे डोळयाचे बाजुस जुने जखमेचा व्रण, केस काळे बारीक.
पोलीस उप निरीक्षक ए.एस. भोसले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मयताच्या बाबत काही माहिती मिळाल्यास ९५२७८८३८२४, व ०२१६६/२२२३३३ यावर संम्पर्क करावा ही विनंती आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी मयताच्या ओळखीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणातील तपास चालू असून, अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.