फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेलऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १८४२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. यामध्ये राज्य शासनाचा सहभाग ९२१ कोटी इतका असून हा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्रकल्प महारेल ऐवजी रेल्वे विभागातर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारत आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.

सदर प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष आभार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!