फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज उत्कृष्ट दर्जाचे करा : आमदार सचिन पाटील


दैनिक स्थैर्य । 16 मार्च 2025। फलटण । फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी फलटण ते बारामती या राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत सुरु असणाऱ्या रस्त्याची सोमंथळी व सांगवी या ठिकाणच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या व त्याची सोडविण्यासाठी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता शेख व ठेकेदार शेळके यांना सूचना दिल्या आहेत.

आमदार सचिन पाटील यांनी रस्त्यातील खड्डे, डिव्हाईडर तसेच रोडच्या कामाची गुणावत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका, अन्यथा कारवाईस सामोरे जावा, तसेच सदर कामाचा गुणवत्ता अहवाल सादर करावा, अश्या सक्त सूचना वजा आदेश संबंधित अधिकारी व ठेकेदार याना दिल्या आहेत. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, युवा नेते संतोष सावंत, चेअरमन महादेव अलगुडे, नाना मोहिते तसेच सोमंथळी व सांगवी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्त्याच्या कामाची पाहणी करताना आमदार सचिन पाटील यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. रस्त्यावरील खड्डे आणि डिव्हाईडरच्या कामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी ठेकेदारांना सूचना दिल्या. या रस्त्याच्या कामाचा गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहिजे, यासाठी आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईची सूचना दिली आहे.

सोमंथळी व सांगवी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाची प्रशंसा केली आहे. त्यांना आशा आहे की हे काम लवकर पूर्ण होईल आणि त्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा मिळेल. आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील नागरिकांना आता चांगल्या रस्त्याची अपेक्षा आहे.


Back to top button
Don`t copy text!