दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | सातारा |
स्व. यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लहान व मोठा गट अशा दोन्ही गटात फलटण तालुक्याने जनरल चॅम्पियनशीप मिळवली.
सातारा जिल्हा परिषद आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लहान व मोठा गट यामधील विविध खेळ प्रकारानुसार वैयक्तिक व सांघिक खेळांच्या गुणांकानुसार ‘जनरल चॅम्पियनशीप’चा बहुमान दरवर्षी दिला जातो. यावर्षी फलटण तालुक्याने तब्बल ११७ गुणांकन प्राप्त करून दोन्ही गटात जिल्ह्यात ‘जनरल चॅम्पियनशीप’चा बहुमान पटकावला. हा बहुमान मिळण्यामध्ये सर्व शाळांमधील खेळाडूंचे मोठे यश आहे.
जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यामार्फत दरवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जातात. यावर्षी छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा येथे दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी लहान गट व मोठा गट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनाला जिल्हा परिषद आसू शाळेची विद्यार्थिनी भारतीय महिला टीममधील कु. वैष्णवी फाळके उपस्थित होती.
या स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात फलटणमधील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. सांघिकमध्ये रिले या खेळ प्रकारात हिंगणगाव/मिरढे शाळा, थ्रो बॉलमध्ये शेरेचीवाडी शाळा, व्हॉलिबॉलमध्ये मिरगाव व निरगुडी शाळा, खो-खो मध्ये चौधरवाडी शाळा, कबड्डीमध्ये मठाचीवाडी या शाळांनी यश संपादन केले.
सर्व यशस्वी विजेत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, गणपतराव सस्ते, संभाजी कानवटे, बन्याबा पारसे, मनिषा चंदुरे, संगीता गायकवाड, दारासिंग निकाळजे, शिक्षक बँकेचे चेअरमन सौ. निशा मुळीक, शिक्षक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर, जिल्हा क्रीडा समन्वयक विकास भुजबळ, राजाराम तोरणे, युवराज कणसे, नवनाथ खरमाटे, सर्व तालुका क्रीडा समन्वयक, सर्व क्रीडा शिक्षक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
फलटण तालुक्याला चॅम्पियनशीप मिळवून देण्यामागे विकास भुजबळ सर, नामदेव मोरे सर, लालासो भोसले, भोलचंद बरकडे, पांडुरंग निकाळजे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल फलटणचे क्रीडा मार्गदर्शक तायाप्पा शेंडगे सर (फिजिकल डायरेक्टर), दत्ता नाळे, जितेंद्र कदम, रणजीत निंबाळकर, गणेश पोमणे, सागर लोंढे, राजेंद्र सरक, नितिन बोबडे, संदिप भोसले, सतिश कवितके, शेखर चांगण, अभिजित ताटे, संदिप कोळेकर, परशुराम दिवेकर, सुनिता सस्ते, मेघा यादव, कल्याणी कदम, रिटा मारुडा व फलटण तालुक्यातील सर्व क्रीडा समन्वयक व सर्व क्रीडाशिक्षक यांचे अभिनंदन यावेळी मान्यवरांनी केले.