
फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटनेची २०२५-३० साठी नूतन कार्यकारिणी निवड. लोकशाही पद्धतीने पार पडली निवडणूक प्रक्रिया.
स्थैर्य, फलटण, दि. २३ डिसेंबर : फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटनेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड आज (सोमवारी) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी श्री. सचिन नारायण क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.
आज झालेल्या निवडणुकीत खालील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली:
-
अध्यक्ष: श्री. सचिन नारायण क्षीरसागर
-
उपाध्यक्ष: श्री. दीपक शिवाजी नलगे
-
कार्याध्यक्ष: श्री. संतोष यशवंत पुंडेकर
-
सरचिटणीस: श्री. संदीप रामचंद्र कुंभार
-
सह सरचिटणीस: श्री. महेश गजानन कुंभार
-
खजिनदार: श्री. निलेश शिवाजी कणसे
-
हिशोब तपासणीस: श्री. विनोद चव्हाण
-
सल्लागार: श्री. कैलास जाधव
-
संघटक: श्री. अविनाश जाधव
-
महिला प्रतिनिधी: पूनम कारंडे, सुवर्णा लावंड
-
मंडलाधिकारी प्रतिनिधी: मनीषा सावळकर
-
मंडल प्रतिनिधी: श्री. वाल्मीक भताने, अंजली धर्माधिकारी, योगेश आदलिंगे
ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्री. रावसाहेब सोडमिसे, पुणे उपविभाग उपाध्यक्ष श्री. प्रशांत पवार, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुहास अभंग आणि फलटण तालुका तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. लक्ष्मण अहिवळे यांनी काम पाहिले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आणि सर्व सदस्यांचे आभार मानले.
