फलटण तालुका शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन आढावा बैठक मुधोजी हायस्कूल येथे संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी गुरुवार, दि. ३ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या शालेय क्रीडा हंगामातील विविध खेळांच्या स्पर्धांचे वेळापत्रक व ठिकाण निश्चित करण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या चित्रकला हॉल ही बैठक झाली.

या बैठकीत शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व ऑनलाईन प्रवेशिकांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान येणार्‍या समस्या, मैदानासाठी उपलब्ध असलेल्या जागा व स्पर्धेदम्यान येणार्‍या अडी-अडचणी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच स्पर्धेदरम्यान क्रीडा शिक्षकांना येणार्‍या समस्या या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या.

यावेळी स्पर्धेच्या ठिकाणांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मैदानी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धा या मुधोजी महाविद्यालय फलटण येथे, कबड्डी स्पर्धा प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल मलठण, फलटण येथे, खो-खो स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे, व्हॉलीबॉल स्पर्धा श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी येथे, फुटबॉल व कराटे स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) जाधववाडी फलटण येथे, कुस्ती स्पर्धा शौर्य सैनिक स्कूल गोळेवाडी फलटण येथे व योगा स्पर्धा या फलटण तालुका क्रीडा संकुल जाधववाडी फलटण येथे होतील.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, फलटण तालुका प्रभारी क्रीडा अधिकारी पाटील साहेब, अध्यक्ष म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, पर्यवेक्षक व्ही. जे. शिंदे, विनोद कुडवे, सातारा क्रीडा कार्यालय अधिकारी, फलटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ सोनवलकर, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, सचिव अजय कदम, सहसचिव पंकज पवार, जिल्हा समन्वयक समितीचे सदस्य तुषार मोहिते, खजिनदार संदीप ढेंबरे, संघटक सचिन धुमाळ, मुकूंद गायकवाड, जनार्दन पवार, तायप्पा शेंडगे यांच्यासह फलटण तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा विभाग प्रमुख, क्रीडा स्पर्धांचे काम पाहणारे सहशिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय कदम यांनी केले तर आभार तुषार मोहिते यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!