इयत्ता दहावीचा फलटण तालुक्याचा निकाल ९४.५६ %; तालुक्यातील १५ शाळांचे निकाल १०० %

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता १० वी) फलटण तालुक्याचा निकाल ९४.५६ % लागला आहे. या परीक्षेस तालुक्यातील विविध ७५ माध्यमिक विद्यालयातून ४४४९ विद्यार्थी/विद्यार्थिनी परीक्षेस बसले, त्यापैकी ४२०७ उत्तीर्ण झाले आहेत.  १४२८ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, १४४५ प्रथम श्रेणीत, १०५२ द्वितीय श्रेणीत, २८२ उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, जाधववाडी, श्रीमान एस. जी. सुर्यवंशी विद्यालय तांबवे, जावली हायस्कुल जावली, मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी, खुंटे हायस्कूल खुंटे, सालपे माध्यमिक विद्यालय सालपे, श्री संत डी. एम. विद्यालय नांदल, कमला निंबकर बालभवन, होळ माध्यमिक विद्यालय होळ, वाजेगाव माध्यमिक विद्यालय वाजेगाव, पांच पांडव माध्यमिक आश्रम शाळा आलगुडेवाडी, अंबिशन इंग्लिश मिडियम स्कूल, आदर्की, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल, बी. जे. इंग्लिश मिडियम स्कूल, खामगाव आणि प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल या तालुक्यातील १५ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १०० % लागला आहे.

मुधोजी हायस्कूल, फलटण ९८.६० %, साखरवाडी माध्यमिक विद्यालय, साखरवाडी ९५.९७ %, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण ८०.३२ %, सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव ९६.८३ %, ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी (आसू) ९०.६५ %, न्यू इंग्लिश स्कूल, निंबळक ९७.४३ %, सरदार वल्लभभाई हायस्कूल, साखरवाडी ९२.९८ %, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल फलटण ९१.१२ %, छ. शिवाजी हायस्कूल, वाखरी ९६.४२ %, न्यू इंग्लिश स्कूल आदर्की बु|| ९४ %, श्री जितोबा विद्यालय जिंती ९०.९० %, मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण ९४.२१ %, म. फुले हायस्कूल सासवड ९६.७२ %, उत्तरेश्वर हायस्कूल विडणी ९६.०३ %, श्री जानाई हायस्कूल राजाळे ९५.४५ %, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी ९४.५० %, जय भवानी हायस्कूल तिरकवाडी ९७.५७ %, संजय गांधी विद्यालय गुणवरे ९३.३३ %, सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी ९२.५९ %, हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी ८८.३७ %, फलटण हायस्कूल, फलटण ८७.९५ %, हिंगणगाव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव ९३.१० %, काळज हायस्कूल काळज ९६.९६ %, तरडफ माध्यमिक विद्यालय तरडफ ८६.६६ %, न्यू इंग्लिश स्कूल निंभोरे ९७.१४ %, मॉडर्न हायस्कूल बरड ८७.६५ %, वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर ८१.८१ %, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल फलटण ७३.६८ %, शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल ९४.७३ %, न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव ९८.२१ %, सिद्धेश्वर हायस्कूल पिंप्रद ९४.४४ %, क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे ९४.६४ %, श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा ताथवडा ९७.२९ %, ढवळ हायस्कूल ढवळ ८९.४७ %, सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर विद्यालय हनुमंतवाडी ९४.२८ %, ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय फडतरवाडी ७२.४२ %, आदर्की माध्यमिक विद्यालय आदर्की ८७.५० %, श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश  स्कूल चव्हाणवाडी ९६.८७ %, भैरवनाथ हायस्कूल मुरुम ७१.४२ %, पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, कुरवली खुर्द ९३.३३ %, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय राजुरी ९२.१० %, श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय मुंजवडी ८७.८० %, न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी ९६.९६ %, श्री धुळदेव विद्यालय धुळदेव ९६.७२ %, दालवडी माध्यमिक विद्यालय दालवडी ९१.१७ %, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल फलटण ९६.७७ %, आंदरुड माध्यमिक विद्यालय आंदरुड ९७.६१ %, लेट मल्हारराव सस्ते विद्यालय सस्तेवाडी ९७.२२ %, चौधरवाडी हायस्कूल चौधरवाडी ९५.२३ %, रावडी माध्यमिक विद्यालय रावडी ८० %, आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालय फलटण ९५%, उपळवे हायस्कूल उपळवे ९६.६६ %, शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी ९६.५५ %, वडले माध्यमिक विद्यालय वडले ९४.५९ %, श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रम शाळा खराडेवाडी ९७.७७ %, माध्यमिक आश्रम शाळा सांगवी ९३.७५ %, निरगुडी हायस्कूल निरगुडी ९०.६२ %, दुधेश्वर माध्यमिक विद्यालय दुधेबावी ६० %, माध्यमिक विद्यालय साठे ८६.३६ %, नियोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ९६ %.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!