
दैनिक स्थैर्य | दि. 02 एप्रिल 2025 | फलटण | फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये काल अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये विशेतः शंभू महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये तुफान पाऊस झाला असल्याने ओढे, नाले, तलाव व पाझर तलाव हे भरत असल्याचे चित्र तयार झाले आहे.
फलटण तालुक्यातील फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की, वाठार, बरड, राजाळे, तरडगाव, कोळकी या सर्व सर्कल मध्ये सरासरी 4.8 मिमी पावसाची नोंद ही कृषी खात्याच्या माध्यमातून नोंदवण्यात आली आहे.
काल झालेल्या पावसामुळे उन्हाळ्यात जरा दिलासा निर्माण झाला आहे. कालच्या पावसामुळे वातावरणात उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण झाला असल्याचे चित्र तयार झाले आहे.