
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी मुधोजी महाविद्यालय क्रीडांगणावर ‘तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील १२, १४, १६, १८ आणि २० वर्षे वयोगटातील मुले आणि मुली सहभागी होऊ शकणार असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेचा शुभारंभ रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेमध्ये धावणे, लांब उडी आणि गोळाफेक अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक खेळाडूला कोणत्याही दोन क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. प्रत्येक प्रकारातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेतील वयोगट आणि क्रीडा प्रकार खालीलप्रमाणे :
- २० वर्षांखालील: १०० मी., ४०० मी., १६०० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक.
- १८ वर्षांखालील: १०० मी., ४०० मी., १००० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक.
- १६ वर्षांखालील: १०० मी., ४०० मी., ८०० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक.
- १४ वर्षांखालील: १०० मी., ४०० मी., ६०० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक.
- १२ वर्षांखालील: १०० मी., ३०० मी. धावणे, लांब उडी, गोळाफेक.
नाव नोंदणी प्रक्रिया: स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी आपली नाव नोंदणी ३० रुपये प्रवेश शुल्कासह दि. २० ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मुधोजी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातून चेस नंबर घेऊन करावी. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी संयोजकांशी संपर्क साधावा.