दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीला सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ. अल्पना यादव, सरचिटणीस नरेश देसाई, सर्जेराव पाटील, फलटणचे निरीक्षक राजूभाई मुलाणी तसेच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी सर्जेराव पाटील, मानाजीराव घाडगे, मुकेश मोहिते, दांगट पाटील, मंजिरी पानसे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार तालुका व शहर पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी प्रास्ताविक करून फलटण तालुक्याचा आढावा सादर केला.
बैठकीत डॉ. सुरेश जाधव व निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी फलटण शहर तालुका व शहर काँग्रेसने बूथ कमिटी, प्रभाग समिती, ग्राम समिती तयार करण्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रशंसनीय कार्य केले असल्याचा आवर्जून उल्लेख केला. आगामी निवडणुका या ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येणार असल्याचे सांगितले. तरी देखील सातारा, माढा लोकसभा काँग्रेसला मिळावी व फलटणला झुकते माप मिळावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन केले. फलटण तालुक्यातील काँगेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तसेच गावभेट दौरा चालू करावा, असे देखील सांगण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश प्रतिनिधी सचिन भैय्या सूर्यवंशी बेडके, फलटणचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शहराध्यक्ष पंकज पवार, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर भाई शेख, उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, ओबीसी सेलचे अल्ताफ पठाण, बालम भाई शेख, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी शिवाजी तात्या भोसले, मनोहर गायकवाड, बालमुकुंद भट्टड, विकास ननवरे, अजय इंगळे, मंझेखान मेटकरी, दिलीप आवारे, विजय जगताप, अजय ढेंबरे, अच्युत माने, निळकंठ निंबाळकर, संतोष बाचल व तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष पंकज पवार यांनी केले व कार्याध्यक्ष अमिरभाई शेख यांनी आभार मानले.
कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकार्यांनी गजानन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केले.