
दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२५ | सातारा |
महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी सातारा व प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांच्या वतीने जिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात फलटण तालुका कृषी विभाग क्रिकेट संघ प्रथम विजेता झाला.
या स्पर्धेत सातारा, वाई, महाबळेश्वर, खटाव, दहिवडी, कराड, पाचगणी, मेढा, जावली, असे एकूण ११ तालुके सहभागी झाले होते.
उपविभागीय कृषि अधिकारी फलटण खलीद मोमीन, तालुका कृषि अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, तंत्र अधिकारी फलटण सुहास रनसिंग व मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक कृषि विभाग फलटण तालुका संघामध्ये उत्कृष्ट पद्धतीने सामना करून प्रथम विजेते झाल्याबद्दल विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर उमेश पाटील व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे यांच्या हस्ते यावेळी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.