फलटण – स्वारगेट विना वाहक, विना थांबा एसटी सेवा पुन्हा सुरू !


दैनिक स्थैर्य । 1 ऑगस्ट 2025 । फलटण । फलटणकर प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काही काळासाठी बंद करण्यात आलेली फलटण – स्वारगेट, स्वारगेट – फलटण विना वाहक, विना थांबा एसटी बस सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.

ही सेवा 1 ऑगस्ट 2025 पासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण एस.टी. आगाराकडून देण्यात आली. ही बस सेवा कामावर जाणार्‍या प्रवाशांसाठी, विद्यार्थी वर्गासाठी आणि पुणे-फलटण दरम्यान दररोज प्रवास करणार्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सेवेला पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक नागरिकांनी मागणी केली होती, आणि ती अखेर मान्य झाली आहे.

ही बससेवा थेट फलटणहून स्वारगेट (पुणे) पर्यंत व स्वारगेट (पुणे) हून फलटण पर्यंत असणार आहे.

या बससेवेसाठी प्रौढांसाठी प्रत्येकी 187 तर बालकांना प्रत्येकी 96 तिकीटदर आकारण्यात येणार असून प्रवासदरात महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50% तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत लागू असणार आहे.

ही बस फलटणहून – स्वारगेटपर्यंत सकाळी 7 वाजलेपासून 11 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला असणार आहे.

तर ही बससेवा स्वारगेटहून – फलटणपर्यंत सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला असणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाने प्रवाशांनी वेळेत आगारात हजर राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!