दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या “फलटण श्री २०२५”चे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण | श्री सद्‌गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, सातारा व कॅप्टन भोसले हेल्थ क्लब फलटणच्या संयुक्त विद्यमाने “फलटण श्री २०२५” भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता महात्मा फुले चौक, फलटण येथे केलेले आहे.

सदर स्पर्धेत ५० ते ५५ किलो, ५५ ते ६० किलो, ६० ते ६५ किलो, ६५ ते ७० किलो, ७० ते ७५ किलो व खुल्या गटाचे स्पर्धकांना प्रवेश मिळू शकणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी रु. १००/- ठेवणेत आली आहे. सदर स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील बॉडी बिल्डर यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराजा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. फलटणचे व्हॉईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!