
दैनिक स्थैर्य | दि. 20 फेब्रुवारी 2025 | फलटण | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागातर्फे दि. 21 फेब्रुवारी 2025 ते दि. 17 मार्च 2025 पर्यंत आयोजित केलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या बैठक व्यवस्थेची जाहिरात करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्र क्रमांक 1003 असलेल्या मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे परीक्षा होणार असून, परीक्षा क्रमांक F0 25558 ते F025955 (एकूण 398 विद्यार्थी) या क्रमांकाची बैठक व्यवस्था या केंद्रावर करण्यात आलेली आहे. विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी बोर्डाने प्रकाशित केलेले अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे रिसीट, ओळखपत्र, लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी 30 मिनिट अगोदर उपस्थित राहावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ (स्मार्ट वॉच), पॉकेट, कॅल्क्युलेटर, इतर इलेक्ट्रॉनिक साधने तसेच बोर्डाने बंदी घातलेली साधने बाळगण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारच्या गैर मार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त व निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी.
परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केंद्र संचालक श्री कदम मनोज अशोकराव, उपकेंद्र संचालक श्री पाटील विजयकुमार हरिभाऊ, श्री नलावडे राकेश बापूराव, श्री घोरपडे उत्तम जगन्नाथ, प्राचार्य श्री वेदपाठक संजय रामकृष्ण, उपप्राचार्य श्री काळे बाळकृष्ण दादा यांनी केले आहे.
या परीक्षेच्या बैठक व्यवस्थेची जाहिरात करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना योग्य ती तयारी करून परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.