
फलटण येथे गुरुवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गजानन चौकात सांगता सभा होणार आहे. मंत्री गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, योगेश कदम, आ. निलेश राणे उपस्थित राहणार आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. १८ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील गजानन चौक येथे सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, योगेश कदम तसेच आमदार निलेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या सांगतेनिमित्त ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महायुतीचे नेते मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत.
या सांगता सभेस मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ही सांगता सभा गुरुवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे पार पडणार आहे.
सभेच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी गाड्या घेऊन येऊ नयेत, तसेच आवश्यक असल्यास नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये किंवा मुधोजी क्लब व अशोका हॉटेल परिसरात वाहने लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
फलटण शहरातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या सांगता सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

