
दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । फलटण । दि.०५/०८/२०२२ रोजी मा. सहा. पोलीस निरीक्षक श्री. अक्षय सोनवणे, सहा पोलीस फौजदार सुर्यवंशी, पो. हवा.ब.नं. ४०१ साबळे, पो. हवा. बडे ब.नं. ९१, पो.काँ अवघडे ब.नं. २५०१, पो.काँ नरबट ब.नं. २५०२ असे सरकारी जीप मधून गुणवरे गावात पेट्रोलिंग करीत असताना मा. पोलीस निरीक्षक श्री. धन्यकुमार गोडसे सो. यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे गुणवरे ता. फलटण गावचे हद्दीत बंडा आण्णासाहेब जाधव यांचे बंद घराचे समोर हिरव्या नेटचे आडोशास इसम नामे अशोक इरन्ना भंडारी रा गिरवी ता फलटण हा ताडीची बेकायदेशीरपणे विक्री करीत आहे. अशी त्यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनि सोनवणे साहेब व वरील पोलीस स्टाफ असे गावडे पेट्रोलपंप गुणवरेचे समोरील बाजूस पोलीस जिप लावून तेथे सोनवणे साहेब यांनी दोन पंचांना बोलावून घेतले व त्यांना मिळालेल्या बातमीचा आशय सहा. पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी समजावुन सांगीतला. ते पंच म्हणुन येण्यास स्वखुशीने तयार झाल्यावर सहा पोलीस निरीक्षक सोनवणे व नमुद पोलीस स्टाफ असे व दोन पंच गावडे पेट्रोलपंप गुणवरे पासून पायी चालत मिळाले बातमी ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी एक इसम काळे रंगाचे स्कुटी क्र. एम. एच. ४२, ए. जी. ३५११ ही स्टँडवर लावून तिचेवर बसून बाजूस प्लॅस्टीकचे पाच कॅन व गाडीवर १ कँन घेऊन बसलेला दिसला. त्याचेवर पोलीसांनी १६.५५ वाजता छापा टाकुन जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक इरन्ना भंडारी वय ४७ वर्षे रा. निंबळक ता. फलटण जि.सातारा असे असल्याचे सांगीतले. त्याचे कब्जात मिळुन आले सहा प्लॅस्टीकचे कॅनची पाहणी केली असता त्यामध्ये ताडी असल्याचे दिसून आले. त्याचे ताब्यात मिळुन आले ताडीचे, साहीत्याचे, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, मोटरसायकल असे एकुण १,२४,८१५ /- रूपये किमतीचा मुद्देमालासह आरोपी मिळुन आलेने सपोनि सोनवणे साहेब यांनी दोन पंचाचे समक्ष पंचनामा करून सदर मुदेमाल जप्त करून आरोपीस पोलीस ठाणेत घेवुन येवुन आरोपी नामे अशोक इरन्ना भंडारी वय ४७वर्षे रा. गिरवी ता. फलटण जि. सातारा याचे विरुध्द ५४४ / २०२२ आय.पी.सी. कलम. ३२८, महाराष्ट्र दारु अधिनीयम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन आज रोजी सदर आरोपीतास मा. न्यायालय एस.बी. ढवळे यांचे कोर्टात हजर केले असता मा. विशेष सरकारी अभियोक्ता पल्लवी खुस्पे यांनी पोलीसांची बाजु भक्कम पणे मांडल्यामुळे मा. न्यायालय एस.बी. ढवळे यांनी आरोपीची ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक सातारा श्री. अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा श्री. अजित बो-हाडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण श्री. तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस श्री. धन्यकुमार गोडसे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अक्षय सोनवणे, सहा पोलीस फौजदार सुर्यवंशी, पो. हवा. बबन साबळे, पो. हवा. अमोल कर्णे पो. हवा. दिपक बडे, पो.काँ. गणेश अवघडे, पो. कॉ. संतोष विरकर व पो.काँ. अजिनाथ नरबट यांनी केली आहे.