दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । फलटण । पुणे रेल्वे परिमंडळातील पुणे ते मिरज दुपदरीकरणच्या कामकाजामुळे पुणे – फलटण – पुणे या मार्गावर चालवली जाणारी 01535/01536 रेल्वे व लोणंद – फलटण – लोणंद या मार्गावर चालवली जाणारी 01537/01538 रेल्वे आजपासून दि. ४ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे.