
दैनिक स्थैर्य | दि. ८ जानेवारी २०२५ | सातारा |
सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची जिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी फलटण उपविभागाची माहिती घेत प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. आगामी काळामध्ये फलटण उपविभागासाठी सर्व ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी ढोले यांना दिले.