फलटण गौरव पुरस्काराने प्रशासनातील फलटणच्या अधिकाऱ्यांचा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम यांच्यावतीने राज्य प्रशासनातील फलटणच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना शनिवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता महाराजा मंगल कार्यालयातील शानदार समारंभात फलटण गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहोळा संपन्न होणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा सौ. निलमताई लोंढे पाटील भूषविणार आहेत.

या समारंभास लायन्स डिस्ट्रिक्त ३२३४ डी १ द्वितीय उप प्रांतपाल MJF लायन भोजराज नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, लायन्स क्लब इंटरनॅशनल रीजन २, झोन १ चे झोन चेअरमन ला. अर्जुनराव घाडगे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात मुंबई पोलीस सह आयुक्त राजेंद्र व्हटकर, अप्पर जमाबंदी आयुक्त पुणे आनंद रायते, सह सचिव महसूल व वन विभाग श्रीराम यादव, उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क सुनील चव्हाण, सह संचालक पर्यटन विकास महामंडळ धनंजय सावळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोलापूर हेमंत निकम, उप जिल्हाधिकारी महसूल पुणे संजय तेली, उप जिल्हाधिकारी महसूल सातारा प्रशांत आवटे, वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ अधिकारी अंकुश नाळे या अधिकाऱ्यांना फलटण गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
या समारंभास फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा सौ. नीलम लोंढे पाटील, खजिनदार सौ. मंगल घाडगे, सेक्रेटरी सौ. वैशालि चोरमले व त्यांच्या सहकारी पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!