
फलटणमध्ये सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाजप अनुसूचित जाती सेलचे शहर अध्यक्ष विकी बोके यांनी शिवसेना शहराध्यक्ष निलेश तेलखडे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १८ डिसेंबर : फलटण शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात शिवसेना शहराध्यक्ष निलेश तेलखडे यांच्या वक्तव्यावर भाजप अनुसूचित जाती सेलचे शहर अध्यक्ष विकी बोके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या हातात सत्ता दिल्यास “फलटणचा अफगाणिस्तान होईल” असे विधान करून भीती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विकी बोके यांनी सांगितले की, गेली ४० ते ५० वर्षे विरोधकांची सत्ता होती आणि त्या काळात विरोधी नगरसेवक निवडून येत होते.
“आज भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनाच तेव्हा मान दिला जात होता. त्या काळात त्या भागाचे काही नुकसान झाले का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विकी बोके यांनी नमूद केले. अशा बिनबुडाच्या आरोपांना फलटणची जनता बळी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
