दिवाळी सणानिमित्त फलटण पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहर व ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना दिवाळी सणानिमित्त विनम्र आवाहन केले आहे.

  • दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जातांना घरामध्ये मौल्यवान वस्तू, रोख रक्कम दागिने इत्यादी ठेवू नयेत, ते बँक लॉकरमध्ये ठेवावेत.

    बाहेरगावी जाताना चांगल्या दर्जाचे लॉक लावावे, सीसीटीव्हीचा उपयोग करावा.

  • फटाके फोडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, लहान मुलांवर लक्ष द्यावे, अपघात टाळावेत.
  • लक्ष्मी पूजन दागिन्यांचे फोटो सोशल मीडियावर उशिराने अपलोड करणे किंवा शक्यतो टाळावे.
  • सोसायटीमध्ये अनोळखी फेरीवाले, अनोळखी इसम विनाकारण फिरताना दिसल्यास पोलिसांना ११२ नंबरवर कळवा.
  • दिवाळी खरेदी करताना ऑफरच्या आमिषापोटी ऑनलाईन फसवणूक होणार नाही, याबाबत दक्ष राहा, सायबर गुन्हेगारांपासुन सावध रहा, आपल्या बँक खात्याची, व्यवहाराची माहिती कोणालाही शेअर करू नका.
  • नागरिकांनी प्रवासात व खरेदी करताना गर्दीमध्ये मोबाईल, दागिने सांभाळा.

वरील बाबींबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!