
स्थैर्य, फलटण : फलटण पंचायत समिती विस्तार अधिकारी संतोष आत्माराम झेंडे वय ४३ यांचे आज (मंगळवार) सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ग्रामीण विकास योजनेंतर्गत विस्तार अधिकारी म्हणून जुलै २०१२ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी त्यांची नियुक्ती केली, सध्या ते फलटण पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून महिला बचत गटाचे काम पहात होते.
वाठार किरोली, ता. कोरेगाव येथील मूळ रहिवासी असलेले संतोष झेंडे एम. ए., बी.पी.एड. होते, सतत हसत खेळत कामकाज करणारे सर्वांशी आपुलकी व प्रेमाचे संबंध जपणारे संतोष झेंडे अचानक गेल्याने संपूर्ण तालुक्यावर दुःखाची छाया पसरली आहे. पंचायत समिती कार्यालयातील प्रत्येक अधिकारी/कर्मचारी दुःख व्यक्त करीत आहेत. त्यांच्या पार्थिवावर फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.