
दैनिक स्थैर्य | दि. 23 एप्रिल 2025 | फलटण | दि. 23 एप्रिल 2025 रोजी पहाटे 05:30 वाजता, लोणंद फलटण रोडवरील नायरा पेट्रोल पंपसमोर घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर चौघे जणांना जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या अपघाताची फिर्याद फिर्यादी लक्ष्मी किशोर कदम यांनी दाखल केली आहे.
ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे, त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा काही वर्षांपूर्वी अपघात झालेला होता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेला अर्धवट अवस्थेतील पूल पूर्णत्वास जाऊन वाहतुकीस होणारा अडथळा दूर होईल अशी आशा फलटणकरांना होती परंतु अद्यापही तिथे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे.
अपघातातील आरोपी मनोज वसंत शिवडीकर (वय 45 वर्ष) हे मुंबईतील धारावी येथील निवासी आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज शिवडीकर यांनी भरधाव वेगात चारचाकी गाडी चालविल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. गाडी कंट्रोल झाली नसल्यामुळे रस्त्यावरील वळणावर गाडी खड्ड्यात घसरली, ज्यात अपघात झाला.
या अपघातात फिर्यादी लक्ष्मी किशोर कदम, तिचे मुलगा रियांश, पुतणी प्रणाली, आणि तिचा पती किशोर परशुराम कदम यांना किरकोळ ते गंभीर दुखापती आल्या आहेत. मात्र, किशोर परशुराम कदम यांचा मृत्यू झाला आहे. मनोज शिवडीकर हेही त्यात जखमी झाले आहेत.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सपोनि नितीन नम हे हा प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी मनोज वसंत शिवडीकर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत.