दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण शहरातील घरगुती गणपती विसर्जन व गणेश मंडळांचे गणपती विसर्जन करण्यासाठी फलटण नगरपालिकेने विविध उपाययोजना राबिविल्या आहेत. श्री गणेशांचे विसर्जन करण्यासाठी नगरपालिका सज्ज झालेली आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.
या वेळी बोलताना मुख्याधिकारी गायकवाड म्हणाले कि, नगरपालिकेच्या वतीने कासार बावडी व पंढरपूर पूल या ठिकाणी क्रेन व्यवस्था केलेली आहे. विसर्जन भागात म्हणजेच बारामती पूल, कासार बावडी, जिंती नाका व पंढरपूर पूल या भागात स्वच्छता करण्यात आलेली आहे. ह्या सर्व भागांमध्ये स्वछता कर्मचारी सेवेसाठी तैनाद ठेवण्यात आलेले आहेत. पेठ महतपुरा, गजानन चौक, महात्मा फुले चौक, डी. एड. कॉलेज चौक या भागात घरगुती गणेश मूर्तींचे संकलन करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचे नियोजन करण्यात आलेले आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, कासार बावडी या ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारण्यात आलेले आहेत. गणपती विसर्जन कालावधीमध्ये पंढरपूर पुलावर आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनाद करण्यात आलेली आहे.