फलटण पालिकेची निवडणूक आर.पी.आय. स्वबळावर लढवणार; विजय येवले व मधुकर काकडे यांची घोषणा


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । फलटण । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या फलटण तालुका प्रभारी युथ अध्यक्षपदी विशाल भानुदास लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान. सदर निवडीवेळी आगामी फलटण नगरपालिकेची निवडणूक आर.पी.आय. स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा सातारा जिल्हा सचिव विजय येवले व पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे यांनी केले.

आर.पी.आय.च्या फलटण शाखेची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आले.

यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, फलटण शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, तालुका उपाध्यक्ष सतीश अहिवळे, शहर उपाध्यक्ष तेजस काकडे, निलेश अहिवळे, मारुती मोहिते, सागर लोंढे, सागर गायकवाड, नितीन अहिवळे, राहुल गुंजाळ, विक्रांत काकडे, चेतन अहिवळे, महिला तालुका अध्यक्ष विमलताइॅ काकडे, शहर अध्यक्ष रेखा कांबळे, मीनाताई काकडे, उपाध्यक्ष कमल काकडे, सुमन काकडे, सुलोचना काकडे, मंगल जगताप, मंगल जाधव, जोती अहिवळे आदींची उपस्थिती होती.

सूत्रसंचालन राजू मारुडा यांनी केले आणि आभार तेजस काकडे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!