
स्थैर्य, फलटण, दि. ८ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७ सदस्यपदांची आरक्षण सोडत आज प्रांतधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. या सोडतीमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, अनेक इच्छुकांना संधी मिळाली आहे, तर काहींना आरक्षित जागेमुळे फटका बसला आहे.
यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपरिषदेच्या एकूण ५२,११८ लोकसंख्येनुसार, १३ प्रभागांमधून २७ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ५ जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ७ जागा आणि एकूण १४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. आता सदस्यपदांचे आरक्षणही जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष अंतिम मोर्चेबांधणीला लागले आहेत.
प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:
- प्रभाग क्र. १: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
- प्रभाग क्र. २: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ३: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
- प्रभाग क्र. ४: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (महिला), सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ५: अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ६: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC, सर्वसाधारण (महिला)
- प्रभाग क्र. ७: सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ८: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC, सर्वसाधारण (महिला)
- प्रभाग क्र. ९: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (महिला), सर्वसाधारण
- प्रभाग क्र. १०: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (महिला), सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ११: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC, सर्वसाधारण (महिला)
- प्रभाग क्र. १२: अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला)
- प्रभाग क्र. १३ (तीन सदस्य): नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण