फलटण नगरपरिषद सदस्यपदांची आज आरक्षण सोडत


स्थैर्य, फलटण, दि. ८ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदांची आरक्षण सोडत आज, बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागील इमारतीत (बीएसएनएल ऑफिस जवळ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोडतीमुळे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!