फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार


स्थैर्य, फलटण, दि. ८ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी नगरपरिषदेच्या भांडार विभागात नागरिकांसाठी उपलब्ध आहे. यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी सोमवार, दि. १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

आज, बुधवारी नगरपरिषद सदस्यपदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. नागरिकांनी प्रसिद्ध झालेल्या यादीत आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. काही चुका आढळल्यास किंवा नावाची नोंदणी नसल्यास, विहित मुदतीत आपली हरकत नगरपरिषद कार्यालयात दाखल करावी, असे आवाहन मुख्याधिकारी जाधव यांनी केले आहे.

नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.


Back to top button
Don`t copy text!