
स्थैर्य, फलटण, दि. १८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दोन्ही प्रमुख गटांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. खासदार गटाने (महायुती) प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हांवर उमेदवार दिले आहेत, तर राजे गटाने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढण्याचे ठरवले आहे. यामुळे आता प्रत्येक प्रभागातील थेट लढती स्पष्ट झाल्या आहेत.
राजे गटाच्या यादीत काही उमेदवार ‘आघाडी’ म्हणून, तर खासदार गटाच्या यादीत प्रभाग १ मध्ये उमेदवार ‘अपक्ष’ म्हणून लढत आहेत.
दोन्ही गटांची प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार यादी खालीलप्रमाणे:
या अधिकृत याद्या जाहीर झाल्याने आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आज (दि. १८) होत असून, त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच प्रत्येक प्रभागातील थेट लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. मात्र, या प्रमुख याद्यांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही गटांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.

