स्थैर्य, फलटण : महात्मा शिक्षण संस्था फलटण संचलित मूक बधिर विद्यालय ठाकूरकि गोळेगाव येथील मूकबधिर विद्यालयाचा दहावीचा निकाल हा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. ज्यांना ऐकताही येत नाही व बोलताही येत नाही. अशा विद्यार्थ्यांना शिकवणे खूप जिकिरीचे असते तरीदेखील अशा मूकबधिर मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे चालू आहे. अशातच अपंग मुलांना शिकवून त्यांचे शैक्षणिक त्याचबरोबर व्यावसायिक पुनर्वसन व्हावे म्हणून गेल्या पाच वर्षापासून महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे असा की, इयत्ता दहावीच्या वर्ग चालविण्यास संस्थेला मान्यता नाही. तरी देखील या संस्थेने स्वताच्या पातळीवर दोन शिक्षकांची नेमणूक करून इयत्ता दहावीचा वर्ग चालू केला आहे. व सलग दोन वर्षे या मुलांना दहावीचे विषय शिकविले जातात व ही मुले नंतर १७ नंबरचा फॉर्म भरून इयत्ता १० वीला बसवली जातात.
सलग दुसऱ्या वर्षी महात्मा शिक्षण संस्थेच्या मूकबधिर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. सायली अंकुश राऊत या विद्यार्थिनीस ७०.४९ % गुण मिळवून ती मूकबधिर विद्यालय विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली आहे. तर कु. सृष्टी दीपक तेली या विद्यार्थिनीला ६९.६० % एवढे गुण मिळाले आहेत व कुमार सचिन ज्ञानेश्वर गावडे या विद्यार्थ्यास ६९.२० % गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना हेमा गायकवाड, वैशाली शिंदे, सौ. मठपती तसेच मुख्याध्यापक दीप्ती देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
विधानपिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटणच्या नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके, कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले, हर्षकुमार निकम, सुनील चव्हाण, राजू भोईटे, विजयकुमार लोंढे पाटील, राजेंद्र रणसिंग, धनाजी जाधव, प्राचार्य विष्णू कुंभार सर, जयकुमार कोठाडिया इत्यादी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.