दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि., फलटण संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिये दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज (गुरुवार) १५ जागांसाठी १५ अर्ज शिल्लक राहिले उर्वरित ६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण सुनिल धायगुडे यांनी केली आहे.
संचालक मंडळावर एकूण १५ सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यापैकी १० सर्वसाधारण, २ महिला राखीव, अनुसूचित जाती/जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रत्येकी एक असे एकूण १५ सदस्य निवडून द्यावयाचे होते.
बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये : सर्वसाधारण १० मध्ये १) ज्ञानेश्वर कोंडीबा तथा डी. के. पवार, पिंपळवाडी २) हणमंत निवृत्ती चव्हाण, शेरेचीवाडी, ३) गणपतराव बाबुराव तथा बबनराव निकम, फलटण, ४) दत्तात्रय शहाजी गुंजवटे, झिरपवाडी, ५) जगन्नाथ ज्ञानदेव शिंदे, कोहाळे,६) संपत गणपत पवार, पवारवाडी, ७) म्हस्कु गेनबा अनपट, सासवड, ८) धनंजय सखाराम पवार, राजूरी, ९) दत्तात्रय परशूराम रणवरे जिंती, १०) सुरेश गेनबा रोमण वेळोशी. इतर मागास वर्ग प्रतिनिधी ११) हनुमंत भिवा नेवसे सस्तेवाडी, वि.जा.भ.ज. प्रतिनिधी १२) हणमंत नानासाहेब बिबे कांबळेश्वर, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी १३) राजकुमार मारुती बाबर कुरवली बु||. महिला राखीव २ जागांसाठी १४) सौ. नंदा राजेंद्र फरांदे फरांदवाडी, १५) सौ. मंगल विश्वास सस्ते, निरगुडी.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या सह दूध उत्पादक व दूध संस्थांचे प्रतिनिधी यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.