फलटण दूध पुरवठा संघ संचालक मंडळ निवडणूक : छाननीत एक अर्ज अवैध, २१ वैध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ लि., फलटण संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जागांसाठी दाखल झालेल्या सर्व २२ उमेदवारी अर्जाची छाननी आज (गुरुवार) पूर्ण झाली. एक उमेदवारी अर्ज अवैध आणि उर्वरित २१ वैध ठरले आहेत. दि. २९ डिसेंबर अखेर उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), फलटण सुनील धायगुडे यांनी सांगितले आहे.

संचालक मंडळावर एकूण १५ सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यापैकी १० सर्वसाधारण, २ महिला राखीव, अनुसूचित जाती/जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रत्येकी एक असे एकूण १५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.
दि. २९ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दि. ३० रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याचवेळी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. आवश्यक असेल तर दि. ८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येणार असून दि. ९ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), फलटण सुनील धायगुडे यांनी सांगितले आहे.

वैध ठरलेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे – सर्वसाधारण १० जागांसाठी धनंजय सखाराम पवार राजूरी, हणमंत निवृत्ती चव्हाण शेरेचीवाडी, दत्तात्रय परशूराम रणवरे जिंती, गणपतराव बाबुराव निकम फलटण, दत्तात्रय शहाजी गुंजवटे झिरपवाडी, जगन्नाथ ज्ञानदेव शिंदे कोहाळे, संपत गणपत पवार पवारवाडी, सौ. विजया हणमंतराव सोनवलकर दुधेबावी, म्हस्कु गेनबा अनपट सासवड, ज्ञानेश्वर कोंडीबा तथा डी. के. पवार पिंपळवाडी, सुरेश गेनबा रोमण वेळोशी, श्रीरंग कृष्णा चव्हाण शेरेचीवाडी, मंगल विश्वास सस्ते निरगुडी. महिला राखीव २ जागांसाठी सौ. राजकुंवर तुकाराम नलवडे आदरकी बु||, सौ. जयश्री हणमंत चव्हाण शेरेचीवाडी, नंदा राजेंद्र फरांदे फरांदवाडी, मंगल विश्वास सस्ते निरगुडी. इतर मागास वर्ग हनुमंत भिवा नेवसे सस्तेवाडी, अनुसूचित जाती राजकुमार मारुती बाबर कुरवली बु||, संतोष आप्पासाहेब भिसे होळ, वि.जा.भ.ज. हणमंत नानासाहेब बिबे कांबळेश्वर.


Back to top button
Don`t copy text!